मंगलवार, 8 जनवरी 2019

लोकसभा शिवसेना स्वबळावर लढणार. आता युती नाही


मुंबई - आमागी लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवला असून स्वपक्षाच्या खासदारांनाही तशा प्रकारचा ‘अिल्टमेटम’ दिला आहे. ज्यांना युतीवरच भरोसा आहे त्यांनी स्वबळावर लढायचे की नाही याचा निर्णय घ्यावा. शिवसेना मात्र स्वबळावरच लढणार आहे, अशा शब्दांत पक्षप्रमुखांनी खासदारांना बजावले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या निर्धारामुळेच अखेर भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्र्यांनीदेखील शिवसेनेबाबत प्रथमच आक्रमक होत लातूरच्या मेळाव्यात प्रतिहल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला. राज्यात व केंद्रात सत्तेत असतानाही शिवसेनेने भाजपला सतत कडवा विरोध कायम ठेवला. तरीही शिवसेना युती करेल अशी आशा भाजपच्या सर्वच नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. मात्र, यावेळी लोकसभेत भाजप सोबत युतीने लढायचे नाही, असे स्पष्ट आदेशच पक्षप्रमुखांनी खासदारांना दिल्याची माहीती आहे. ज्या खासदारांना युती व्हावी असे वाटते त्यांना उद्धव ठाकरे यांनी नुकतेच युतीचा विचार सोडण्याचे बजावले आहे. युती केल्यास शिवसेनेला भाजपचा लाभ होतो असा दावा केला जात असला तरी शिवसेनेचाही लाभ भाजपला मोठ्या प्रमाणात होतो अशी यामागे अटकळ बांधली आहे. त्यातच भाजप नेत्यांच्या एककेंद्री कारभाराने मागील पाच वर्षात शिवसेनेला सतत सावत्रभावाची वागणूक मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे युतीची गरज शिवसेनेला आहे तशीच ती भाजपला देखील असल्याचे मानले जाते. मनोबल खचू नये म्हणून...
जानेवारी २०१७ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पहिल्यांदा स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पक्षाच्या सर्वच बैठका व सभांमध्ये त्यांनी याची पुनरावृत्ती केली होती. तरीही शिवसेना अखेरच्या क्षणी युती करेलच असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत होता. मात्र, आता युती केल्यास शिवसैनिकांचे मनोबल खचेल व त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसेल अशी चर्चा असून त्याबाबत उद्धव ठाकरेदेखील सहमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काहीही झाले तरी युती होणार नाही. शिवसेना स्वबळावरच निवडणुका लढेल असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें