रविवार, 30 दिसंबर 2018

संत रेखेबाबा यात्रा कापडसींगीचा प्रारंभ

सेनगाव - संत रेखेबाबा यात्रा कापडसिंगी ला
आजपासुन सुरवात झाली. या यात्रेला हजारो भावीक
भक्त दर्शनासाठी कोसो मैल दुरुन येतात
यात्रा कमेटी नी चांगली व्यवस्था भाविकासाठी केली होती
यात महाप्रसादासाठी आलोट गर्दी बघायला मिळाली

गुरुवार, 27 दिसंबर 2018

सेनगाव पंचायत समिती पाणी टंचाई आढावा बैठक

सेनगाव -गुरुवारी पंचायत समिती सेनगाव येथे पाणी टंचाई  संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक मा हिंगोली विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार तान्हाजी मुटकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला शिक्षण सभापती भय्यासाहेब देशमुख भाजपा जेस्ट नेते के के शिंदे काँग्रेस चे गटनेते विनायकराव देशमुख तहसीलदार पाटील मॅडम गटविकास अधिकारी काळे साहेब पंचायत समितीच्या सभापती  उपसभापती सेनगाव भाजपा तालुका अध्यक्ष अशोकराव ठेंगल जिल्हा उपाध्यक्ष सुर्यभानजी ढेंगळे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल घोगरे तसेच सर्व डिपार्टमेंट चे प्रमुख अधिकारी सर्व ग्रामसेवक सर्व सरपंच उपसरपंच व प्रमुख नागरिक या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत अतिशय चांगल्या प्रकारे पाण्याचा संदर्भात निर्णय घेण्यात आले सर्व काही बाबी वेळेवर सोडवण्यासाठी आमदार साहेब यांनी आदेश दिले आहे या वर्षीच्या पाणीटंचाई बाबत अतिशय चांगल्या प्रकारे बैठक आज सर्वांच्या साक्षिणे पार पडली व सर्व सरपंच ग्रामसेवक व सर्व नागरिकानी या बैठकीला मोठा प्रतिसाद दिला......

मराठा शिवसैनिक सेना व राष्ट्रीय समाज पक्ष छेडनार आंदोलन

हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी
दिनांक 3 जानेवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय
गेटबंद आंदोलन मराठा शिवसैनिक सेना व राष्ट्रीय समाज पक्ष
 यांच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी
 हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे

बुधवार, 26 दिसंबर 2018

दुष्काळा बाबत सेनगावला शिवसेनेची बैठक

दुष्काळा बाबत सेनगावला महत्वाची
बैठक दी 28 तारखेला आहे. या बैठकीत तालुक्यातील
सर्व पदाधिकारी उपस्थीत रहानार आहे. या बैठकीचे मार्गदर्शक
शिवसेना जिल्हाउपप्रमुख संदेशराव देशमुख आहे.
या महत्वाची बैठक काय आढावा घेते या कडे व
शेतकरी नेते संदेशराव देशमुख यांच्या भुमिकेकडे
सर्व तालुक्याचे लक्ष लागले आगे.



दुष्काळा बाबत सेनगावला शिवसेनेची बैठक

दुष्काळा बाबत सेनगाव तालुक्यातील
 सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी यांची
 बैठक होनार आहे या मधे शिवसेनेचे सर्व
आजी माजी पदाधिकारी उपस्थित रहानार आहे.
या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक
 शिवसेना   जिल्हा उपप्रमुख संदेशराव देशमुख
 हे असनार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवानी उपस्थित रहावे.

मंगलवार, 25 दिसंबर 2018

आमदार वडकुते तुम्ही दारु पिऊन आलात बाहेर व्हा -मुटकुळे

हिंगोली : हिंगोलीत कोतवालांच्या प्रश्नावर दोन आमदारांची शाब्दिक चकमक उडाली. पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यासमोर झालेल्या एका बैठकीत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार राम वडकुते यांना तुम्ही दारू पिऊन आला आहात का, असा सवाल करत बाहेर जाण्यास सांगितले.हा प्रकार काल हिंगोली विश्रामगृहात घडला. पालकमंत्री दिलीप कांबळे हे काल जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राज्यभर कोतवालांच्या संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कांबळे यांना भेटण्यासाठी वडकुते तिथे गेले होते. तेथे भेटण्यापूर्वी वडकुते यांनी मुटकुळे यांना फोन केला होता. कोतवालांच्या प्रश्नांवर तुम्ही काय निर्णय घेतला आहे, अशी विचारणा वडकुते यांनी मुटकुळे यांना केली. त्यावर पालकमंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारला याबाबत पत्र लिहिणार असल्याचे मुटकुळे यांनी पलीकडून सांगितले. त्यावर पत्र लिहिण्यातच तुमची पाच वर्षे गेली. आता आणखी किती विलंब लावता, असा टोला वडकुते यांनी लावला. त्यावर तुमच्या सत्तेच्या काळात कोतवाल नव्हते का, असा प्रतिप्रश्न मुटकुळे यांनी वडकुते यांना केला. फोनवरच दोघांचे संभाषण जोरात झाले.त्यानंतर वडकुते हे विश्रामगृहावर गेले. तेथे ते काही बोलू लागताच मुटकुळे यांनी तुम्ही दारू पिऊन आला आहात का, असा सवाल विचारत बाहेर जाण्यास सांगितले. वडकुते यांनी बाहेर येऊन सारा प्रकार माध्यमांना सांगितला. तसेच सत्ताधारी आमदाराला प्रश्नही विचारायचे नाहीत, अशी वेळ आली आहे. मी तर दारूच्या थेंबाला आयुष्यात स्पर्श केलेला नाही. तरी सत्ताधारी आमदार असे बोलत असतील तर त्यांना सत्तेचा माज आला आहे, असेच वाटते. या प्रकारावर मुटकुळे यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

सोमवार, 24 दिसंबर 2018

आर आर आबाचा नवा वारसदार विधानसभा लढवणार

राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे वारसदार आता लवकरच विधान सभा लढवणार आहेत. असे जयंत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात स्पष्ट केले.आबांचे चिरंजीव रोहित पाटील हे तासगाव विधानसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढवतील, अशी घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. आबांसारखी रोहितची वक्तृत्वशैली आहे. त्यामुळे पुढची विधानसभा रोहितला मिळणार असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहीर केले.महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारी २०१५ ला निधन झाले. सांगलीजवळच्या तासगावातून अत्यंत तळातून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या पाटील यांची प्रतिमा ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा अशी होती. तब्बल पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पाटील यांनी सर्वात जास्त काळ गृहमंत्रीपदही भूषवले होते.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. त्या मोठ्या मताधिक्याने तासगाव मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या.